¡Sorpréndeme!

Special Report Raj Thackeray MNS : राज म्हणाले पाठिंबा द्या! फडणवीस म्हणाले सोबत या!

2025-03-31 8 Dailymotion

Special Report Raj Thackeray MNS : राज म्हणाले पाठिंबा द्या! फडणवीस म्हणाले सोबत या! 
चांगल्या कामांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अर्थात या पाठिंब्यासाठी राज ठाकरेंनी एक अटदेखील घातली होती. या सगळ्यावर आज फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि राज ठाकरेंच्या मुद्द्यांची दखल घेतली. पण मुद्द्यांची दखल घेणारे फडणवीस राज ठाकरेंच्या पाठिंब्याची आणि त्यासाठीच्या अटीची दखल घेणार का, हा प्रश्न मात्र कायम राहिला. पाहूया, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट.  


लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी रविवारच्या गुढीपाडवा मेळाव्यात फडणवीसांना जाहीरपणे पाठिंबा दिला. 

अर्थात मोदींना दिलेला पाठिंबा आणि फडणवीसांना दिलेला पाठिंबा यात एक मूलभूत फरक होता.

मोदींना दिलेला पाठिंबा 'बिनशर्थ' होता, मात्र फडणवीसांना दिलेल्या पाठिंब्यामागे एक शर्थ होती. 
हा सशर्त पाठिंबा जाहीरपणे न स्विकारता किंवा जाहीरपणे न नाकारता मुख्यमंत्री फडणवीसांनी मुद्द्यांचा विचार करू, एवढेच संकेत दिले.  


महाराष्ट्रात गाजत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी आपली भूमिका जाहीर केली.

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असणं ही राज यांना ‘गरज’ वाटली, तर फडवीसांनी मात्र ती ‘मजबुरी’ असल्याचं स्पष्ट केलं.