पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? मोदींचा वारसदार नेमका कोणत्या राज्यातून असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण ठरवणार? हे प्रश्न पडलेयत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना. महत्वाची गोष्ट अशी की या प्रश्नांची उत्तरही राऊतांकडे आहेत. मोदींच्या वारसदाराबद्दल संजय राऊत काय म्हणतायत... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
ठाकरेंचे खासदार संजय राऊतांना... थेट मोदींच्या वारसदारांवर प्रश्न पडलाय.. कारण... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा... आणि त्यातही संघ मुख्यालयाची भेट..
मोदींचं संघ मुख्यालयात येणं.. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत असणं... आणि संघाच्या कार्याचं मोदींनी केलेलं कौतुक... या सगळ्या घटनाक्रमाचा संजय राऊतांनी त्यांना हवा तसाच अर्थ काढला आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश केला खरा पण फडणवीसांनी राऊतांचे विचार मुघल संस्कृतीशी जोडून सगळी भविष्यवाणी फेटाळून लावली.
तर भाजप आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर चांगलंच तोंडसुख घेतलं...
दरेकर आणि शिरसाट यांनी तर ठाकरेंना मिळालेल्या वारशाचीही आठवण करुन दिली.