आठ वर्षांपूर्वी मोदी सरकारनं नोटाबंदीचा घेतलेला निर्णय तुम्हाला आठवत असेल. त्या निर्णयानंतर ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा एका रात्रीत चलनातून बाद झाल्या. पण या नोटा आजही राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पडून आहेत. राज्यातील आठ जिल्हा बँकांच्या तिजोरीत तब्बल १०१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा धूळ खात पडल्या आहेत. या नोटांचं नेमकं काय होणार? कोट्वधींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून राहण्याचं नेमकं कारण का? पाहूयात या खास रिपोर्टमधून...
५०० आणि हजार रुपयांच्या या नोटा ८ वर्षांपूर्वीच कालबाह्य झाल्या... पण राज्यातल्या अनेक मध्यवर्ती बँकांमध्ये असलेल्या या नोटा जर रिझर्व्ह बँकेनं घेतल्या नाहीत तर या नोटा रद्दीमध्येच जातील.... राज्यातल्या मध्यवर्ती जिल्हा बँकांमध्ये तब्बल १०१ कोटी रुपयांच्या नोटा पडून आहेत...
मग प्रश्न असा आहे की, या नोटा जिल्हा बँकांमध्ये अजूनही का पडून आहेत? रिझर्व्ह बँकेनं त्या परत का घेतल्या नाहीत?