¡Sorpréndeme!

Special Report Walmik Karad And Baban Gite Gang War : कारागृहात गँगवॉर! कराड Vs गित्ते भिडले?

2025-03-31 24 Dailymotion

Special Report Walmik Karad And Baban Gite Gang War : कारागृहात गँगवॉर! कराड Vs गित्ते भिडले?
Special Report Walmik Karad And Baban Gite Gang War : कारागृहात गँगवॉर! कराड Vs गित्ते भिडले? 
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्राला बीडमधली वाल्मिक कराडची दहशत अवगत झाली... मात्र म्हणतात ना.. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी..  बीड कारागृहात गँगवॉर सुरू  झालंय.. वाल्मिक कराडची टोळी आणि बबन गित्तेची टोळी आमनेसामने उभी ठाकली... आणि या गँगवॉरवरून पुन्हा एकदा बीडमधली कायदा-सुव्यवस्था वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.. काय  आहे कराड आणि गित्ते टोळीमधलं हाडाचं वैर? कोण आहे बीड कारागृहातला गब्बर? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मोठा आरोपी 
मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार आरोपी  वाल्मिक कराड आणि बबन गित्ते म्हणजे एकमेकांचे हाडाचे वैरी...  आणि याच दुश्मनीचा पिक्चर बीडच्या कारागृहात पाहायला मिळाला..  वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बबन गित्ते टोळीतला महादेव गित्ते बीडच्या जिल्हा कारागृहात कैद आहेत..  कराड गँग आणि गित्ते गँग आमनेसामने आली..  मात्र नेमकं कुणी कुणाला मारलं? याचा सस्पेन्स कायम आहे..  कारण महादेव गित्तेनं कराड आणि घुलेला मारहाण केल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलीय..