Top 60 Superfast News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP Majha
नोटबंदीच्या आठ वर्षानंतरही डीसीसी बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून, नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेचा नकार, पुणे डीसीसीकडे 22 तर सर्वाधिक 25 कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 25 कोटींच्या नोटा आरबीयने बदलून दिल्या नाहीत, याबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागितल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती, या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करावा, मुश्रीफांची विनंती
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जवळपास २१ कोटींच्या जुन्या नोटा पडून, रिझर्व्ह बँकेने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे स्वीकारले नाहीत, या रकमेचा बँकेला काहीच फायदा होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
'म्हाडा'च्या २०२५-२६ साठी सादर १५ हजार ९५१ कोटी २३ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी, महाराष्ट्रात 'म्हाडा'तर्फे येत्या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ सदनिका बांधण्याचं उद्दीष्ट, तर मुंबईत येत्या आर्थिक वर्षात ५ हजार १९९ सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दीष्ट.
धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ, ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन, त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त, 5 एप्रिललला धारावित सभेचं आयोजन.