¡Sorpréndeme!

Mahadev Gitte :कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नीनं फेटाळला आरोप

2025-03-31 1 Dailymotion

Mahadev Gitte Walmik Karad : कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली, गित्तेच्या पत्नी मिरा गित्तेनं फेटाळला आरोप
महादेव गित्तेनं कराड, घुलेला मारहाण केली नाही, वाल्मिक कराडच्या लोकांनी महादेव गित्तेसह इतरांना मारहाण केली. महादेव गित्तेच्या पत्नी मीरा गित्तेन फेटाळला मारहाणीचा आरोप
बीड : दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik karad) याच्यासह 6 जण बीज जिल्हा कारागृहात आहेत. सध्या याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने सध्या जिल्हा कारागृहात आहेत. मात्र, आज सकाळी वाल्मिक कराड आणि बबन गिते गँगमधील महादेव गिते यांच्यात मारहाण झाल्याचे वृत्त माध्यमांत झळकले आहे. आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली होती. या कारागृहाचे अधीक्षक मुस्लिम असल्याने ते रमजान ईदनिमित्ताने ते आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे, कारागृहात मारहाणीची घटना घडली. त्यामध्ये, वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता बीड (Beed) जिल्हा कारागृह प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली.