Mahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलं
बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला दुसरीकडे हलवलं --------- कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गित्तेवर आरोप ---------- महादेव गित्तेसह ४ आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहिती -------- वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन मारहाण झाल्याचा आरोप
बीड : वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सूल कारागृहात हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आम्हालाच मारहाण झाली आहे, आणि आम्हालाच दुसऱ्या कारागृहात हलवलं जात असल्याचा आरोप यावेळी महादेव गित्तेने केला. कारागृहातील सीसीटीव्ही तपासा, यामागची खरी परिस्थिती समोर येईल असंही महादेव गित्ते याने सांगितले.
बीड जिल्हा कारागृहात कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली.
कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या कारागृहात कैद असलेले वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली. गित्ते टोळीतल्या महादेव गित्तेनं कराड आणि घुलेवर हात उचलल्याची माहिती समोर आली. पण हा दावा महादेव गित्तेने खोडून काढला. उलट आपल्यालाच मारहाण झाली असून त्याचे सीसीटीव्ही चेक करावे असंही तो म्हणाला.