ABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या झाल्याचा अंजली दमानियांना संशय.. कळंबमधील महिला मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं.
बीड जेलमध्ये टोळीयुद्ध, देशमुख हत्याकांडातील वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला गित्ते गँगकडून मारहाण झाल्याचा सुरेश धस यांचा दावा, तर फोन लावण्यावरून वाद झाल्याची कारागृह प्रशासनाची माहिती
महादेव गित्तेसह चार आरोपींची हर्सुल कारागृहात रवानगी, कराडकडून आपल्याला मारहाण झाल्याचा गित्तेचा आरोप तर पोलिसांकडून कराडला जावयासारखी वागणूक, दमानियांचा आरोप
अंदर मारना या मरना सबकुछ माफ है... जेलमधील मारहाणीनंतर बबन गित्तेची सूचक फेसबुक पोस्ट, बापू आंधळे खून प्रकरणी बबन गित्ते ९ महिन्यापासून फरार
राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करु, पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी राऊतांचा खोचक टोला
पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊतांचं भाकित, तर २०२९मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय, देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
औरंगजेब कबरीचा विषय अनावश्यक, आक्रमक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना संघाच्या भय्याजी जोशींचा सल्ला, औरंगजेबचा मृत्यू महाराष्ट्रात झाल्यानं त्याची इथं कबर असल्याचं मत