Raj Thackeray on Aurangzeb : प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं असं राज यांचं औरंगजेब प्रकरणावर भाषण
Raj Thackeray : गुढी पाडव्यानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. कुंभमेळा, धर्म, राजकारण, प्रदुषण या मुद्यावरुन राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांवर जोदार हल्लाबोल केला. याचबरोबर महाराष्ट्राचील नद्यांची स्थिती देखील किती बिकट आहे याचवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तसेच औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. जाणून घेऊयात राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे.
औरंगजेब आम्ही इथं गाडला, कबरीजवळ मोठा बोर्ड लावा
औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिलसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांनी संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथं गाडला गेला. हा आमचा इतिहास असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही कुणाला गाडलं हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हणाले. तिकडे लहान लहान मुलांच्या ट्रीप गेल्या पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले.
धर्माच्या नावाखाली नद्या बरबाद
नदी प्रदुषणाच्या मुद्यावर राज ठाकरेंनी भाष्य केलं. धर्माच्या नावाखाली आपण नद्या बरबाद करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सर्वांना आपापला धर्म प्रिय असतो, पण यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असे राज ठाकरे म्हणाले. धर्माच्या गोष्टी मला सांगू नये कोणी असेही ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या त्यातील चार नद्या मारल्या गेल्या आहेत. सांडपणी झोपडपट्यांमधून मारल्या गेल्या. आता मिठी नदी उरली आहे असे राज ठाकरे म्हणाले.
विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत, जंगलतो़ड थांबली पाहिजे
सगळीकडे झाडं जगवा झाडे लावा असे बोर्ड लावले जातात. मात्र, दुसरीकडे हिंदुचे अंत्यसंस्कार लाकडावर होतात. जंगलतो़ड झाल्याशिवाय लाकूड येणार नाही. याला पर्याय म्हणून विद्युतदाहिन्या आल्या आहेत. देशभर विद्युतदाहिन्या झाल्या पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगलात गेले होते परदेशी माणसांबरोबर. पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. त्यांना प्राण्यांचीही आवड आहे. जंगले जगवली पाहिजेत असेही राज ठाकरे म्हणाले. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईत आहे ते जगात कुठेही नाही. पण सध्या सगळीकडे जंगलतोड सुरु आहे असे राज ठाकरे म्हणाले.