¡Sorpréndeme!

Raj Thackeray Speech : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या प्रांतावर झालेला संस्कार ABP MAJHA

2025-03-30 1 Dailymotion

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक कार्यक्रम दिला. महाराष्ट्र सैनिकांनी उद्यापासून बँकेत जाऊन तुम्ही प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते का ते पाहा असं राज ठाकरे म्हणाले. 

धर्म प्रत्येकानी जोपसला पाहिजे, उंबराठ्याच्या आतून बाहेर आणला तर बुलडोजर आणा.  मी म्हणालो होतो मशीदवरचे लाऊडस्पीकर बंद करा. अजूनही लाऊड स्पीकर मशीद वरचे सुरु आहेत. आता उत्तर प्रदेश मध्ये योगींनी लाऊड स्पीकर बंद केले मात्र आपल्या राज्यत सुरु आहेत,असं राज ठाकरे म्हणाले.

संतोष देशमुख प्रकरण काय मारलं हो..तुम्हाला एवढी मस्ती असेल तर मी तुम्हाला जागा दाखवतो. खंडणीचा विषय होता. आता पर्यत ऐकलं होतो राखेतून फिनिक्स पक्षी येतो. येथे बीड मध्ये राखेतून गुंड तयार होतात? आता खंडणीचा विषय होता याला जातीचा विषय केला आणि वंजाऱ्याने मराठ्याला मारलं असा दाखवलं यात कुठून आला मराठा कुठून आला वंजारी, हा पैशाचा विषय होता तुम्हाला जातीत गुंतवतंय, असं राज ठाकरे म्हणाले. 

आता अजित पवार म्हणाले कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांची ,वाटेल त्या घोषणा तुम्ही निवडणुकीच्या वेळी केल्या आणि तुम्ही भाबडेपणाने मतं दिली कशी? लाडकी बहीण योजनेला द्यायला पैसे आहेत कुठे, असा सवाल देखील त्यांनी केला.  मूळ प्रश्न सगळे बाजूला पडले. तुम्ही जातीपातीचा भेद सोडून एक मराठी म्हणून एक झालं पाहिजे. इतका राजकारणचा झालेला चिखल कधीच पाहायला नाही, इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत पाहायला मिळाला नाही. सगळे इंस्टाग्राम वर गुंतून पडलेत, असं राज ठाकरे म्हणाले.