Raj Thackeray Speech : खालून प्रेत गेलं असेल एखादं...राज ठाकरंची तुफान फटकेबाजी ABP MAJHA
Raj Tahckeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडत आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील नद्यांवरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. कुंभमेळ्यातील गंगेच्या स्थितीपासून राज्यातील 55 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत मुंबईत 4 नद्या 'वारल्या' नव्हे मारल्या. एक मिठी नदी मरणासन्न अवस्थेत आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी नद्यांवर बोललो की धर्म आडवा येणार ? असा संतप्त सवाल केला.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्रातली कोकणातली सावित्री नदी घ्या. केमिकलने भरली आहे. देशभरात एकूण 311 नदीपट्टे असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून प्रदूषित महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यातील सर्वात प्रदूषित नद्या उल्हास नदी मिठी नदी मुळा मुठा सावित्री भीमा पवना तापी कान्हा तापी गिरणा पुंडलिका दारणा इंद्रायणी निरा वईनगंगा चंद्रभागा मुचकुंडा गोड कीतुर कृष्णा वर्धा पाताळगंगा, सूर्या वाघुळोरडोरणा यांना द्या यांना द्यान मधलं पाणी अत्यंत वाईट आहे. मुंबईमध्ये पाच नद्या होत्या. अनेकांना आता त्या माहीतही नसतील. त्यातल्या चार मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी झोपडपट्ट्या मूळ या चार नद्या मेल्या. पाचवी आता मरायला आली आहे ती नदी म्हणजे मिठी नदी. मुंबईमधील पाचवी मिठी नदी तिची दुरावस्था व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी दाखवली.