Raj Thackeray Speech : कुंभमेळा, गंगा ते प्रदुषण...राज ठाकरेंचं सरकारवर पलटवार ABP MAJHA
Raj Thackeray Speech : कुंभमेळ्याचं पाणी प्यायलो नाही असं म्हटल्यावर नवीन वारं गेलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय. पण प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही तर गंगेच्या पाण्याचा आहे असं राज ठाकरे म्हणाले. गंगेमध्ये अर्धवट जाळलेली प्रेतं टाकली जातात. गंगेचं पाणी हे पिण्यासाठी नाही तर अंघोळीसाठीही योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले. ज्यांना या गोष्टी कळत नाहीत त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नयेत असंही राज ठाकरे यांनी ठणकावलं.
Raj Thackeray Speech : काय म्हणाले राज ठाकरे?
पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. कुंभमेळ्यातून पाणी आणलेलं पिणार नाही असं सांगितलं. नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान केला. ज्या नदीला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्यांची अवस्था ही भीषण आहे. गंगा साफ करावी असं पहिल्यांदा राजीव गांधी यांनी म्हटलं. त्यांनी ते कामही सुरू केलं. तेव्हापासून अजूनही गंगा साफ होतेय. मोदींनीही तेच सांगितलं.
आपल्याकडच्या देशातल्या नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिण्याचं सोडाच पण अंघोळही करू शकत नाही. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर अनेकजण आजारी पडल्याचं एकाने सांगितलं.
प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचं किंवा गंगेचा अपमान करण्याचं नाही. प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा.
असं सांगत राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला. गंगेच्या शुद्धीकरणावर 33 हजार कोटी खर्च करण्यात आलं आहे. एका महंताला तसंच टाकून देण्यात आलं. अर्धवट प्रेत जाळले जातात आणि तसेच गंगेत टाकले जातात.
जर धर्म अशा प्रकारे आडवा येत असेल तर काय करायचं याचं? काळ बदलला. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हेच सगळे विधी आटपण्यासाठी त्या घाटावर एक वेगळी जागा करता येत नाही का?
कुंभमेळ्यामध्ये 65 कोटी जनता येऊन गेले असं सांगण्यात आलं. म्हणजे अर्धा भारत आला का?
महाराष्ट्रातल्या नद्यांचीही हीच परिस्थिती आहे. सावित्री नदीची अवस्थाही तीच आहे. देशभरात 311 नदीपट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे.