¡Sorpréndeme!

Special Report On PM Modi Nagpur : स्वंसेवक पंतप्रधान मोदी, संघाची स्तुती;भाजप-संघातली ओढाताण संपली?

2025-03-30 3 Dailymotion

Special Report On PM Modi Nagpur : स्वंसेवक पंतप्रधान मोदी, संघाची स्तुती;भाजप-संघातली ओढाताण संपली?
Special Report On PM Modi Nagpur : स्वंसेवक पंतप्रधान मोदी, संघाची स्तुती;भाजप-संघातली ओढाताण संपली? 
संघ म्हणजे अक्षय्य वट, अविरत चालणारा यज्ञ... पंतप्रधान मोदींचे हे संघाविषयीचे गौरवोद्गार... नागपुरात पंतप्रधानांनी डॉ. हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करत भाजप आणि संघ यांच्यातल्या धुसफुशीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला का? भविष्यात परिवारातंर्गत सुरू असलेला हा वाद या भेटीनंतर अखेर संपणार का असा सवाल उपस्थित झालाय.  
पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना नागपूरकरांचा उत्साह असा ओसंडून वाहत होता.. 
संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशीमबागला भेट दिली.  
तब्बल ३० वर्षांनंतर देशाचे पंतप्रधान हेडगेवार स्मृतीभवनात आले. सरसंघचालक मोहन भागवत या भेटीवेळी उपस्थित होते. जवळपास २० मिनिटं पंतप्रधान मोदी हेडगेवार स्मृतीभवनात होते.  
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी दीक्षाभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. संविधानाची ७५ वर्षे, संविधानाची गळचेपी होत असल्याची विरोधकांची टीका या पार्श्वभूमी ही भेट महत्त्वाची होती...  
तिथून पंतप्रधान मोदी संघाच्या अनेक उपक्रमांपैकी एक असलेल्या माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीच्या पायाभरणी सोहळ्याला उपस्थित झाले. पंतप्रधान काय बोलणार याची उत्सुकता अगदी सरसंघचालकांनाही लागली होती तसं त्यांनी बोलूनही दाखवलं.