Chhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. एकूण ५० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामध्ये ६० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक जितेंद्र यादव यांच्या समोर आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहामध्ये परतण्याचा निर्णय घेतला.
तर छत्तीसगडमधील पोलीस आणि नक्षलवाद्यांमधील चकमक कॅमेरात कैद झाली. काल झालेल्या या चकमकीमध्ये १७ नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाले. तर नक्षलींची दोन हात करताना चार पोलीस गंभीर जखमी झाले. या चकमकीचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.. एकूण ५० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.. ज्यात ६० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या १३ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.. पोलिस अधीक्षक जितेंद्र यादव यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला.