मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष, महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे कोणती घोषणा करणार याची उत्सुकता, राज्यभरातले मनसैनिक शिवाजी पार्कच्या दिशेनं
नागपूर दौऱ्यात पंतप्रधानांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती, स्वतःचाही स्वयंसेवक म्हणून उल्लेख, संघाच्या माधव नेत्रालयाची मोदींच्या हस्ते पायाभरणी
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच रेशीमबागेत, हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन, तर दीक्षाभूमीलाही भेट, सोलर इंडस्ट्रिजच्या टेस्टिंग रेंजचही उद्घाटन
छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी, वकिलांकडून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ, जामीनावर एक एप्रिल रोजी सुनावणी
तब्येतीच्या कारणास्तव साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनात मोबाईलद्वारे संवाद... मुस्लिम संघटनांचा उपस्थितीला होता विरोध
वैयक्तिक भांडणातून बीडमधील मशिदीत जिलेटीनचा स्फोट, सुदैवाने कोणी जखमी नाही, आरोपीला बेड्या, स्फोटापूर्वीची माथेफिरूचं रिल व्हायरल
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा लढवण्याचा अमित शाहांचा निर्धार, पाटण्यात घोषणा, एनडीए पुन्हा जिंकेल, भाजपला विश्वास