Gudi Padwa Superfast News : गुढीपाडव्याच्या सुपरफास्ट बातम्या : 30 March 2025 : ABP Majha
राज्यभर आज गुढीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकणी पारंपारिक शोभायात्रांचा आयोजन.
गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची गिरगावात यात्रा.
आदित्य ठाकरेंचा गिरगावमधील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत सहभाग, यावेळी आदित्य ठाकरेंनी लुटला ढोल वाजवण्याचा आनंद.
गिरगावच्या शोभायात्रेत खंडोबाच्या वेशभूषेत तरुण, पारंपरिक पोशाख परिधान करुन अनेकजण शोभायात्रेत सहभागी.
गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त भव्य रांगोळी, मराठी नववर्षाचं सर्वत्र जोरदार स्वागत.
गिरगाव शोभायात्रेत मराठी कलाकारांची हजेरी, कलाकारांना पाहून नागरिकांचा उत्साह वाढला, तर अभिनेत्री सई ताम्हणकरलाही आवरला नाही सेल्फी घेण्याचा मोह.
ठाण्यातील शोभायात्रेमध्ये चित्ररथाचं खास आकर्षण, शोभायात्रेत विविध संस्कृतीचं दर्शन.
ठाण्यातील शोभायात्रेत तरुणाईने साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा, मर्दानी खेळांसह जनजागृतीचे अनेक संदेश.
ठाण्यातील शोभायात्रेत महिलांचा उत्साह, लक्ष वेधून घेणारे लेझीम पथक आणि महिलांचा मराठमोळा लुक