¡Sorpréndeme!

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 30 March 2025 : ABP Majha

2025-03-30 0 Dailymotion

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 30 March 2025 : ABP Majha 
मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी. जवळपास ७० हजार कार्यकर्ते बसू शकतील अशी आसन व्यवस्था, मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. 
मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना. मुंबईत मनसेचं जोरदार शक्तिप्रदर्शन. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपुरकरांकडून जल्लोषात स्वागत. मोदींच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करत स्वागत.  
नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक, भाषणादरम्यान संघाच्या सेवाकार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. 
स्वातंत्र्याआधी डॉ. हेडगेवार, गुरूजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली, आज त्या कार्याला वटवृक्षाचं रूप, पंतप्रधान मोदींकडून संघाच कौतुक, आरएसएस भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षयवट, मोदींचं वक्तव्य 
जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक, नैसर्गिक आपत्ती असो वा काहीही, कोणत्याही संकटात स्वयंसेवक सैनिकासारखे पोहचतात, मोदींचं वक्तव्य, तर
मोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असाच उल्लेख, स्वंयसेवकांविषयी बोलताना 'हम' असा उल्लेख.