¡Sorpréndeme!

ABP Majha Marathi News Headlines 3 PM Top Headlines 3 PM 30 March 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

2025-03-30 0 Dailymotion

ABP Majha Marathi News Headlines 3 PM Top Headlines 3 PM 30 March 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स  
संघाच्या सेवाकार्याची पंतप्रधान मोदींकडून स्तुती, हेडगेवारांनी लावलेल्या सेवाबीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य..संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी,  
पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, तर दीक्षाभूमीलाही भेट देत वंदन 
संघाच्या नागपुरातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी बाजारगावच्या सोलार इंडस्ट्रिजमध्ये, मानवविरहित एरिअल सिस्टीमची टेस्टिंग रेंज आणि धावपट्टीचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घघाटन..  
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारुन पूजन..  
पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधवांच्या फोटोला फासलं काळं...मनसे पदाधिकाऱ्यांनीच काळं फासल्याची माहिती... 
यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी नाही या अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत कडाडले...नैतिकतेच्या आधारे अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी...तर शिंदेंनी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसावं, राऊतांचा खोचक सल्ला...