¡Sorpréndeme!

100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 30 March 2025

2025-03-30 0 Dailymotion

100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान 30 March 2025

संघाच्या माधव नेत्रालयाची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, संघाच्या निरपेक्ष सेवाकार्याची पंतप्रधानांकडून उत्स्फूर्त स्तुती, हेडगेवारांनी लावलेल्या सेवाबीजाचा वटवृक्ष झाल्याचं वक्तव्य.. 

पंतप्रधान मोदींचं नागपुरात संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांना अभिवादन, सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेही पंतप्रधानांसह उपस्थित

पंतप्रधान मोदींचं दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, १२ ते १३ मिनिटं पंतप्रधान दीक्षाभूमीवर, प्रमुख भन्तेंसह केली प्रार्थना

राज्यभर आज गुडीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपरिक शोभायात्रा, मेळाव्यांचं नियोजन. नाट्यसिने कलाकार, नेते मंडळींचाही सहभाग

गिरगावच्या शोभायात्रेत ठाकरेंच्या शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरेंचा सहभाग, ढोल वाजवत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा..

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारुन पूजन.. 

कुणाल कामराला थर्ड डिग्री देण्यावर मंत्री शंभूराज देसाई ठाम, कबुली न दिल्यास टायरमध्ये घालून पाहुणचार नक्की, देसाईंचं पुन्हा वक्तव्य

छत्रपती शिवरायांची अवमानना करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडी संपल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने कोर्टात पेशी, जामीन मागण्याचा मार्ग मोकळा