¡Sorpréndeme!

Prashant Koratkar Case : प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी लगेच अर्ज करणार

2025-03-30 0 Dailymotion

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. आता प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (25 मार्च 2025) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर 28 मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. 

कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

यावेळी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहे. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.