¡Sorpréndeme!

PM Narendra Modi Diksha Bhumi Nagpur : पंतप्रधान मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदन

2025-03-30 0 Dailymotion

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देऊन येथील स्मृति मंदिराला नमन केलं आहे.


यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघ मुख्यालयातून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले होते. सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर नेते देखील प्रामुख्याने उपस्थित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघ प्रमुख मोहन भागवत रेशीमबागेत दाखल झाले होते..


त्यामुळे एक स्वयंसेवक राहिलेले, प्रचारक राहिलेले, मात्र सध्या देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय पदी असलेले नरेंद्र मोदी जेव्हा संघाच्या कार्यालयात येत आहेत. तेव्हा सरसंघचालक मोहन भागवत ही तिथे उपस्थित आहेत.


मात्र जेव्हा संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी स्वयंसेवक म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संघात येत आहे, तेव्हा सरसंघचालक तिथे उपस्थित राहतात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


भाजपचं सर्वोच्च नेतृत्व जेव्हा संघस्थानी पोहोचत आहे, तेव्हा ते संघ आणि भाजप यांच्या संबंधांसाठी महत्त्वपूर्ण दिवस तर आहेच. सोबतच देशाच्या राजकारण आणि समाजकारणावर ही या पंधरा मिनिटांच्या भेटीचे अनेकविध परिणाम येणाऱ्या दिवसात होणार आहे.
दरम्यान, नागपुरातील हिंसाचारच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज नागपूर दौरा होत आहे. परिणामी प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त तैनात करत जोरदार तयारी केली आहे. अशातच शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधानांचा स्वागत करणारे होर्डिंग नागपूर शहर आणि ग्रामीण भाजपकडून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहे. त्यापैकी बहुतांशी होर्डिंग वर 'एक है तो सेफ है' ही घोषणा दिसून येत असून या बॅनर्सची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.