¡Sorpréndeme!

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 30 March

2025-03-30 1 Dailymotion

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 

पंतप्रधान मोदींचा आज नागपूर दौरा, हेडगेवार स्मृतीभवनासह दीक्षाभूमीलाही भेट, ३३ कोटींहून अधिक किंमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांची आज रेशीमबागेत भेट, मोदींच्या दौऱ्यावेळी पूर्णवेळ भागवत सोबत राहणार

राज्यभर आज गुडीपाडव्याचा उत्साह, गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरात पारंपारिक शोभायात्रा, मेळाव्यांचं नियोजन. नाट्यसिने कलाकार, नेते मंडळींचाही सहभाग

गुढीपाडवा मेळाव्यात आज राज ठाकरे फुंकणार रणशिंग, विधानसभेतल्या दारूण अपयशानंतर पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न, राज्यातल्या सध्याच्या मुद्द्यांसह आगामी मनपा निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे करणार भूमिका स्पष्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा...२००८ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता...

यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी नाही, अजित पवारांच्या विधानाला फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा दुजोरा...तर अजित पवारांनी विश्वासात घेऊन भूमिका घ्यायला हवी होती, शिरसाटांकडून अप्रत्यक्ष नाराजी..

सरकारच्या कर्जमाफीच्या भूमिकेवरून विरोधकांकडून हल्लाबोल...जुमला केला हे सरकारनं मान्य करावं, वडेट्टीवार कडाडले...तर घोषणा करताना तिजोरीची कल्पना नव्हती का?, राजू शेट्टींकडून अजित पवार लक्ष्य...