Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान, नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?
नितेश राणे...सध्याची त्यांची ओळख आहे...राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री. पण मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या राणेंची भाषा मात्र त्या पदाला शोभणारी आहे का? असा प्रश्न पडतोय. याचं कारण त्यांची वादग्रस्त विधानं. आणि त्यांच्या या विधानांमध्ये धार्मिक द्वेषच जास्त दिसून येतोय. आता तर त्यांनी इतिहासातला दाखला देत एक विधान केलंय. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. नितेश राणेंचं ते वक्तव्य काय होतं? आणि त्यावरुन नेमकं कोणतं रणकंदन माजलं? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट....
शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते, असं नितेश राणेंचं म्हणणं... एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुस्लीम अशीच होती, असा दावा करून वादाला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न केलाय... त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी तलवार उपसलीय... आणि शिवरायांच्या सैन्यातल्या मुस्लीम अधिकाऱ्यांची यादीच राणेंना वाचून दाखवलीय...