Fadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!
अशा पद्धतीने एखादा रस्ते झाले पाहिजे, विकासासाठी आवश्यक आहे, मान्य आहे. मला परंतु एक प्रश्न आहे: जनतेच्या भावना सुद्धा सरकार जपणार का? माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडला, शासनाची भूमिका स्पष्ट आहे. शासनाला शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये. मागच्या मुख्यमंत्री आणि आताच्या आपल्या देखील काही पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे. त्यामुळे हा महामार्ग केवळ अठाच नाही आहे, तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास 12 जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेल आहे आणि ज्या वेगाने त्या ठिकाणी त्याच परिवर्तन होत आहे, तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे. आम्ही जरूर आपल्या सोबत बसून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊ, कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू. पण माझी देखील आपल्याला विनंती आहे की या सर्व जिल्ह्यांच्या विकासाकरता, आज मला सांगा की कोल्हापूर वरन पाऊन तासात मोपा एअरपोर्टला जाता येईल, तासभरात जाता येईल. यानी जे काही आपलं कॉमर्स आणि बिझनेस आहे, याच्यात फरक नाही पडणार, परिवर्तन नाही होणार. त्याच्यातन त्यामुळे हा महामार्ग काही आमचा अठास नाहीये, महाराष्ट्राच्या विकासाकरता अत्यंत महत्त्वाचा असा महामार्ग आहे. आणि आता शेतकरी हे मैदानात उतरले आहेत. आज जसा मोर्चा तिप्पट मोठा मिळावा, आता शेतकरी याला समर्थन देणारा घेणार आहेत आणि म्हणून माझी आपल्याला ही विनंती आहे, आपण त्याच्यामध्ये मध्यस्ती करावी, त्यांच्या अडचणी असतील तर आमच्याशी चर्चा करावी, त्या चर्चेतन आपण मार्ग काढू. कोणावरही न लादता, आपल्याला कल्पना असेल की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस अशाच लोकांच्या विविध संकल्पना होत्या, पण ज्या गावामध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या गावानी अख गाव त्यांनी कन्सेंट अवॉर्डने सगळ्या जमिनी दिल्या. कारण सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना असं वाटत आम्हाला पैसे मिळतील की नाही, किती मिळतील, कमी मिळतील का? पण एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला योग्य भाव मिळतो आहे, त्यांची जमीन जाते त्याच्या चौपट पाचपट भाव आपण देतो आणि त्याचा त्याला फायदा असा होतो की पैसे मिळतात ते बिन याचे पैसे मिळतात, टॅक्सचे पैसे मिळतात आणि त्याच्यात त्यापेक्षा जमीन देखील घेऊ शकतो. आणि म्हणून हा आपला सगळा खटाटोप आहे, तर आपण देखील याच्यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विनंती आहे.