एका तरुणाला अमानुष मारहाण करणारा दादा खिंडकर हा दुसरातिसरा कुणी नसून तो धनंजय देशमुखांचा साडू आहे.. धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता.. एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल दादा खिंडकरांमुळे उपस्थित होतोय..
धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर, ज्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा विडिओ सोशल मिडियावर वायरल होतोय, त्या दादा खिंडकरांची माहिती 13 जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मस्साजोगमधे टाकीवर चढून आंदोलन केलं होतं त्यावेळीही दादा खिंडकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होते दादा खिंडकर हे बीडमधील बाभुळवाडी गावचे सरपंच आहेत.धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून एका युवकाला अमानुष मारहाण, दादा खिंडकरच्या टोळीकडून युवकाला पाईप, काठ्या आणि बेल्टने मारहाण, या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई नाही.