Krishna Andhale Nashik : संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशकात? CCTV
आजची सर्वात मोठी बातमी पाहूयात.. संतोश देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरमध्ये सहदेव नगरच्या दत्त मन्दिर परिसरात आंधळे दिसला, त्याच्या तोेंडाला मास्क आणि कपाळावर टीळा होता.. त्याला हटकताच तो आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून पळून गेले, असा स्थानिकांचा दावा आहे. याबाबत माहिती मिळाल्यावर नाशिक पोलीस तातडीनं कामाला लागले.. पोलिसांचं एक पथक दत्त मंदिर परिसरात दाखल झालं, आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. ----------------- पाहूयात आंधळेला कथितरित्या पाहणाऱ्या स्थानिकांनी काय माहिती दिलीये.. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मन्दिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची स्थानिकांची माहिती स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल Cctv फूटेज ची तपासणी करून पोलीस खातरजमा करणार तोंडाला मास्क आणि कपाळी टिळा होता असे वर्णन स्थानिक सांगत आहेत नागरिकांनी हटकल्यांतर मोटारसायकल वरून पळून गेल्याचा नागरिकांचा दावा