Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP Majha
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी, केज जिल्हा, सत्र न्यायालयात आज पहिली सुनावणी. हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार. आज न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे जबाब सादर केले जाणार.
वाल्मिक कराड जेलमध्ये असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याचा सीसीटीव्ही दाखवा, धनंजय देशमुखांची मागणी, बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळे प्रमाणेच इतर कोणी आलं का? देशमुखांकडून संशय व्यक्त.
आवादा कंपनीला धमकी जगमित्र कार्यालयासह सातपुडा बंगल्यावरूनही आली, याप्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, अंजली दमानियांची मागणी.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर ३०७ आणि ३५३ सारखे गंभीर गुन्हे दाखल, यामधील एक केस ही केज, तर दुसरी केस माजलगाव कोर्टातील आहे, अंजली दमानियांचा दावा.
सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, आज बीड न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी.
प्रशांत कोरटकरांना दिलासा नाहीच. आज कोर्टात कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी.