Ajay Munde PC Beed : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, अजय मुंडे यांचे Suresh Dhas यांच्यावर टीकास्त्र
Ajay Munde on Suresh Dhas : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कौटुंबिक बाबींवर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टावर जोरदार हल्ला चढवला होता. यानंतर धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) आज माध्यमांशी संवाद साधत सुरेश धस यांचे आरोप फेटाळले आहे. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
अजय मुंडे म्हणाले की, सुरेश धस यांनी एका वृत्त वहिनीवर मुलाखत दिली. त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही, असे चुकीचे वक्तव्य केले होते. सुरेश धस हे मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल बोलत आहेत. त्या परळीला आल्या नाही. त्यांचे चुलत भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा त्यांनी आरोप केला. पण आमच्या बाई परळीत राहत होत्या. मात्र त्या गावी राहत आहे. धनंजय मुंडे त्यांच्या आई सोबतच राहतात. धस यांच्या आरोपाला अर्थ नाही, असे त्यांनी म्हटले.