9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha
विधानपरिषदेवर अजित पवारांचे समर्थक नाना काटेंचा दावा, चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना पुढं संधी दिली जाईल असा शब्द अजितदादांनी दिल्याची काटेंची माहिती,
आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर, सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीकडून मल्टी सर्विस चालकाला बेदम मारहाण, या व्हिडीओमुळे सोळंकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी. धमकीची ऑडिओ क्लिप जुलै २०२३ मधील असल्याची माहिती.
प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस, आज सुनावणीसाठी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
राष्ट्रवादीत विधानपरिषदेच्या जागेसाठी इच्छुकांची गर्दी, आमदारांमधून १ तर राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या १ जागे साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात १०० पेक्षा जास्त विनंती अर्ज
हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती, विधानसभेला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने भाऊ पाटील होते नाराज .