¡Sorpréndeme!

Orange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दर

2025-03-11 1 Dailymotion

Orange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दर 
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन!!! "बी" व "सी" ग्रेड च्या संत्र्यासाठी तब्बल 22 रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरी आनंदित.. पतंजलीचा ऑरेंज ज्यूस प्लांट सुरू झाल्यानंतर बदलतोय चित्र!!! असे संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू व्हावे आणि ते टिकावे याची सरकारने घ्यावी काळजी, शेतकऱ्यांची मागणी...  नुकतंच नागपूर जिल्ह्यात संत्र्यावर प्रक्रिया करणारा "ज्यूस प्लांट" पतंजली फूड पार्क मध्ये सुरू झाला आहे... रोज 800 टन संत्र्याची आवश्यकता या ज्यूस प्लांटला असल्यामुळे अवघ्या दोन दिवसातच शेतकऱ्यांना "बी" आणि "सी" ग्रेडच्या संत्र्याला 22 रु प्रति किलोचे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे... मुळात "बी" आणि "सी" ग्रेडच्या संत्र्याला बाजारात डागाळलेला किंवा लहान आकाराचा संत्रा म्हणून कोणीही घेत नव्हतं, त्याचा संत्र्याला 22 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना हक्काचं अतिरिक्त उत्पन्न मिळू लागला आहे...   दरवर्षी विदर्भातील प्रत्येक संत्रा बागेत किमान 15 ते 20 टक्के संत्रे एक  तर फळगळतीमुळे खाली पडतात आणि त्यांच्या सालीवर डाग लागतात, किंवा या संत्र्यांचा आकार लहान असल्यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव मिळत नाही.. परिणामी शेतकऱ्यांना हे 15 ते 20% संत्रे कवडीमोल दरात विकावे लागायचे किंवा फेकून द्यावे लागायचे.. मात्र आता ज्यूस प्लांट मध्ये त्याच संत्र्याला 18 ते 22 रु प्रति किलो असा चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी चालून आली आहे... हे प्रकल्प अल्पकालीन ठरू नये याची संबंधित उद्योग समूह आणि सरकारने काळजी घ्यावी अशी अपेक्षा वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे....