निकटवर्तीयांच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यातले आमदार वादात, धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांपाठोपाठ आता प्रकाश सोळंके अडचणीत,सोळंकेंच्या निकटवर्तीयाकडून दुकानदाराला मारहाण
शिवरायाबद्धल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंताना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीनाला सरकारचं हायकोर्टात आव्हान.. आज तातडीची सुनावणी
लाडक्या बहिणींना २१०० रूपये नाहीच, अर्थसंकल्पीय तरतुदीतही तब्बल १० हजार कोटींची घट, विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता
पुण्यातील कसब्याचे माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम..उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश
सोनिया गांधींच्या घरी काँग्रेसची महत्वाची बैठक, संसदेत सरकारला घेरण्यासाठी विचार विनिमय.. संसदेत आजही गदारोळाची शक्यता.. मतदार याद्यांमधल्या घोळावर चर्चा अपेक्षित, भाषेच्या मुद्दयावर कनिमोळींचा हक्कभंग प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून दोन दिवसांचा मॉरिशस दौरा.. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी आमंत्रित
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे चिरंजीव चैतन्यची आज ईडी चौकशी.. एकवीसशे कोटींच्या मद्य घोटाळ्यात काल दिवसभरातल्या छापेमारीनंतर चौकशीचं समन्स,
मध्यप्रदेशातील महू मधील हिंसाचाराप्रकरणी दोन गुन्हे दाखल, आतापर्यंत तेरा दंगेखोर ताब्यात.. दंगेखोरांना रासुका लावण्याची तयारी, आरोपींच्या शोधासाठी सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी
५८० सफाई कामगारांना मुंबई पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.. कामगारांनी चिकाटीने दिलेल्या लढ्याला यश, आझाद मैदानात कामगारांचा जल्लोष
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर सायबर हल्ला.. एलन मस्कचाही दुजोरा.. रात्री देशविदेशात एक्स ठप्प झाल्याच्या तक्रारी.. पॅलेस्टिन समर्थक हॅकर्स ग्रुपने घेतली सायबर अटॅकची जबाबदारी
चॅम्पिन्स ट्रॉफी पटकावणारा चॅम्पियन संघ मायदेशात परतला, कर्णधार रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत, चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळावरही चाहत्यांची गर्दी