Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra News
राज्यात ४० लाख कोटींच्या परकीय गुंतवणुकीचं लक्ष असून त्यातून ५० लाख रोजगार निर्मितीचं लक्ष, अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती, कामगारांसाठी नव्या कायद्याचीही निर्मिती करणार, अजित पवारांची माहिती.
लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातून नाही, त्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरच समाधान मानावे लागणार.
लाडकी बहीणसाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी खर्च, अजित पवारांची विधानसभेत माहिती, तर आगामी काळात लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, अर्थसंकल्पातून घोषणा.
लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत. प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार. योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै , डिसेंबर महिना आहे. फडणवीसांचं लाडकी बहिण योजनेवर स्पष्टीकरण.
मायक्रोसॉफ्टकडून १० हजार महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण, तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार, अजित पवारांची घोषणा.
मुद्रांक शुल्कात सरकारकडून वाढ, दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी १०० ऐवजी १००० हजार रुपये मुद्रांक शुल्क, एकाच कामासाठी एक पेक्षा अधिक मुद्रांक वापरले तर १०० ऐवजी ५०० रुपये मोजावे लागणार.