¡Sorpréndeme!

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP Majha

2025-03-11 1 Dailymotion

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP Majha  
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामी गोदावरी अभियान, कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधीकरण
रामकालपथ विकास कार्यक्रम हाती घेणार, अजित पवारांची माहिती, तसंच रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसर विकसित करण्याचं सरकारचं उद्दीष्ट.  
पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत सौरऊर्जा कामांना वेग, १ लाख ३० हजार घरगुती ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा संच, ७० टक्के ग्राहकांचं वीजबिल शून्यावर येणार. 
राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील तापमान वाढलं, मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद, मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा ५ अंश सेल्सिअस तापमान अधिक. 
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुर गावावर भीषण पाणीटंचाईचं संकट. हजारो महिलांचा ३ किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा. संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासनानंतर मोर्चा घेतला मागे.  
जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय. 
विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी एक किंवा दोन दिवसांसाठी देवाच्या दर्शनी वेळेत बदल. जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या बैठकीत ठरणार नेमके किती दिवस दर्शन व्यवस्था बदलावी लागणार.