¡Sorpréndeme!

ABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025

2025-03-10 0 Dailymotion

| रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, फायनलमध्ये न्यूझीलंडवर चार विकेट्सने मात, रोहित, श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ, तब्बल १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचा कब्जा
---------------------------------
((रोहितसेना 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'))

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार, जनतेला महायुतीकडून रिटर्न गिफ्टची अपेक्षा, लाडक्या बहिणींचा हप्ता २१०० रूपये होणार का याची उत्सुकता

आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार तर भाजप हिंदुत्वादी देशप्रेमी हे फेक नरेटीव्ह, आरएसएससह भाजपवर उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण
गद्दारांनी पक्ष चोरला, वडील चोरले तरी मशाल घेऊन मी ठाम उभा आहे..गद्दारांनी आता 'शिवसेना अमित शाह' असं नाव लावावं, निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची शिंदेंवर आगपाखड

मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य...ओबीसी-मराठा हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा..

पुण्यात रस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका करणारा गौरव अहुजा आणि मित्राला एकदिवसाची पोलीस कोठडी.. येरवडा कारागृहात  व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचा आरोप

तीर्थांची परीक्षा करू नये, ६५ कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीर दास यांची प्रतिक्रिया.

पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तीकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, सरकार मूर्तीकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन.

नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्तं  'गोष्ट संविधानाची' या १० भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधेंसह अनेक जण उपस्थित.

रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्यावतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन, १९ मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलनाने होणार अभियानाची सांगता.

परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण, छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण.

भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरीत निवारण व्हावं यासाठी राबवली ई-दरबार संकल्पना, यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक.

चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवर कठोर व्हावी, चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप व्यक्त..