¡Sorpréndeme!

Special Report Marathi :हॉटेलात मेन्यू कार्ड मराठी करा,ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह, मुंबईकर म्हणतात..

2025-03-09 2 Dailymotion

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी भाषेबद्दलचा वाद हा रोज नवी वळण घेतोय.. एकीकडे मुंबईतील पाट्या मराठीत केल्या तर दुसरीकडे मराठी समजत नाही हिंदी मै बोलो असा सूर काही दुकानातून आला. या सगळ्यात राजकारण होत राहीलं आता हे प्रकरण हॉटेलच्या मेन्यू कार्डवर आलेत.. हॉटेल मधले मेन्यू कार्ड आणि बिल हे मराठी मध्ये असावे अशी मागणी आता तग धरू लागलीये..पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट.  मेन्यू कार्ड मराठी करण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह मेन्यू कार्ड मराठी भाषेत छापा, हॉटेल मालकांना ठाकरेंच्या शिवसेनेची विनंती मुंबईतील हॉटेल्समध्ये जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेकडून पत्रकांचं वाटप 'मेन्यू कार्ड, बिलं मराठीत करण्याच्या सूचना द्याव्यात' ठाकरेंच्या शिवसेनेची पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला तिथलं मेन्यूकार्ड सर्रास इंग्रजीतून बघायला मिळतं...  महाराष्ट्रात खासकरून मुंबईतच मेन्यूकार्डवरही मराठी भाषेचा उपवास आहे...  पण हे चित्र बदलण्यासाठी आता ठाकरेंची शिवसेना सरसावलीय...  इतर राज्यात जसं स्थानिक भाषेला प्राधान्य दिलं जातं  तसंच महाराष्ट्रातही मराठी भाषेला प्राधन्य द्यावं  आणि हॉटेलमधील मेन्यू कार्डसह बीलही मराठीतून द्यावं अशी मागणी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जातेय  यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलंय