पुणे : वसंतदादा शुगर इन्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होते आहे. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त दिलीप वळसे-पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त व नियामक मंडळ सदस्य उपस्थित आहे.राष्ट्रवादी फुटीनंतर अनेक ठिकाणी अजित पवार हे काका शरद पवार यांच्या समोर येत नसल्याचं दिसत आहे.आज वसंतदादा शुगर इन्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ ठिकाणी दोन्ही पवार एकत्र आले आहे तसेच व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांची आसन एकमेकांच्या शेजारी ठेवण्यात आली असताना कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार येताच त्यांनी नाव प्लेट बदलली आणि सहकार मंत्री बाबसाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली.