शिर्डी : भाजपाचा वतीने शिर्डीत एक दिवसीय महाविजय अधिवेशन आयोजित करण्यात आलेय. या अधिवेशनाला राज्यातील मंत्र्यांनासह केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थिती लावलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा हस्ते शिर्डीतील भाजपाचा एक दिवसीय अधिवेशनाचा सांगता समारोप होणार आहे. शिर्डी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आज शनिशिंगणापूर येथे जावून शनिदेवाचे दर्शन घेतले आहे. यानंतर शिर्डीला येवून साई मंदिरात जावून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. यावेळी अमित शाहा यांनी साईबाबांची पद्य पूजा केलीय. तसेच शिर्डी माझे पंढरपूरही छोटी आरती केलीय. यावेळी साईबाबा संस्थान तदर्थ समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अंजु एस. शेंडे यांनी अमित शाहा यांचा शॉल साई मूर्ती देवून सत्कार केलाय.