¡Sorpréndeme!

कल्याण डोंबिवलीत केला जाणार ड्रोन कॅमेराचा वापर !

2024-11-18 0 Dailymotion

एकीकडे विधानसभा निवडणुकीचा राजकीय प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशा ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जात असून कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीतील विविध भागांमध्ये या ड्रोनचे टेस्ट रन केले.