जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात एक जुनी इमारत कोसळल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत दोन महिला ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. त्यात एका महिलेला बाहेर काढण्यात यश आलंय.