¡Sorpréndeme!

गोष्ट मुंबईची भाग: १२४ । पवनीचा स्तूप ते मुंबईची तारा, बौद्ध धम्माचा महाराष्ट्रातील इतिहास

2023-08-19 3 Dailymotion

इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासू महाराष्ट्रामध्यो बौद्ध धम्माचे प्रभावी अस्तित्व पाहायला मिळते. त्याचे पुरावे राज्यभरात सर्वत्र विखुरलेले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील बौद्ध स्तूप आणि नालासोपाऱ्याला असलेला बौद्ध स्तूप व सम्राट अशोकाचा शिलालेख हे त्याचे महत्त्वाचे पुरावे आहेत. याशिवाय संपूर्ण राज्यभरातील बौद्ध इतिहासातही चांगलेच वैविध्य पाहायला मिळते. धम्माची समृद्धी महाराष्ट्राने दीर्घकाळ अनुभवली आणि पाषाणामध्ये अंकितही झाली. राज्यभरातील धम्माचा हा तब्बल २३०० वर्षांचा इतिहास मुंबईमध्ये नव्याने साकारण्यात आलेल्या बौद्ध दालनामध्ये एकाच फेरीत सहज अनुभवता आणि समजूनही घेता येतो. बीएआरसीच्या परिसरात सापडलेली बौद्ध देवता असलेल्या तारेची अनोखी शिल्पकृती ही तर कलेची परमावधीच ठरते!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #buddha #museum #chhatrapatishivajimaharajvastusangrahalaya