एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पक्ष वाढीसाठी प्रयत्नात असताना दुसरीकडे पक्षातील काही लोक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
जोगेश्वरी पूर्वेतील वार्ड क्र. ७७ चे शाखाप्रमुख प्रकाश शिंदे व त्यांचे जवळपास २०० हुन अधिक कार्यकर्ते सामूहिक राजीनामा देणार असल्याचे प्रकाश शिंदे यांनी सांगितले आहे. वर्षभर पक्षासाठी दिवसरात्र राबलो, लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला तरीही शाखेसाठी देण्यात आलेला निधीवर पक्षातील काही लोकांनी डल्ला मारल्याचा आरोप प्रकाश शिंदे यांनी केला आहे. या संबंधित पत्रव्यवहार करून सुद्धा अद्याप न्याय मिळाला नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.