¡Sorpréndeme!

लाखोंची जिम बांधली..अन् काही वर्षात "खंडर" झाली..

2023-07-27 1 Dailymotion

लाखो रुपये खर्चून बांधलेल्या जिमचा झाला उकिरडा..व्यायामाला येणाऱ्या तरुण ऐवजी व्यसनी लोकांचा बनला अड्डा.. पुन्हा एकदा व्यायाम शाळा सुरू करण्याची तरुणांची मागणी..

छत्रपती संभाजी नगर मध्ये तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या महापालिकेच्या जागेवरील व्यायाम शाळेची अक्षरशः दुरावस्था झाली आहे.. चहुबाजूनी कचरा तर आत मध्ये व्यायामाच्या साहित्य ऐवजी नशेखोरांचं साम्राज्य पाहायला मिळतं.. हा सर्व प्रकार आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन सिक्स मधील श्री संभाजी कॉलनीतला..

सिडको एन 6 परिसरात मनपाच्या खुल्या जागेवर सुसज्ज व्यायाम शाळा उभारण्यात आली.. यात व्यायामाचे अध्ययवत साहित्य हे आले.. पण प्रत्यक्षात ही व्यायाम शाळा सुरू झाली नाही.. त्यामुळे या इमारतीचा अक्षरशः उकिरडा झाला आहे.. तुटलेल्या खिडक्या धुळीचा खाताना उघडलेले सिलिंग आणि त्यात रिकाम्या बाटल्या, कचरा.. अशी भयंकर अवस्था या व्यायाम शाळेची झाली आहे..संपूर्ण इमारतीलाच कचऱ्याचा विळखा आहे..