¡Sorpréndeme!

Ajit Pawar: अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र?; चर्चांना उधाण

2023-04-18 0 Dailymotion

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा अंक पाहण्यास मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.