¡Sorpréndeme!

मनापातील भ्रष्ट्राचारावरून आशिष शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप; चौकशीची केली मागणी

2023-03-28 5 Dailymotion

मुंबई महापालिकेतील कारभाराच्या पारदर्शकतेवर कॅग अहवालातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. मनपाच्या एसएपी प्रणालीत घोटाळा असून त्याबाबत आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहलं आहे. कट, कमिशन, कसाईचा गोरखधंदा ठाकरेंच्या नाकाखाली सुरू होता, असा गंभीर आरोप करत एसआयटी चौकशीची मागणीही शेलार यांनी केली आहे.