¡Sorpréndeme!

Ambadas Danve on Sanjay Shirsat: शिरसाट यांचा 'तो' दावा; अंबादास दानवेंनी दिलं स्पष्टीकरण

2023-03-27 103 Dailymotion

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आपल्याला फोन आला होता. राजकारणात काहीही घडू शकतं, असं सूचक विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या या दाव्यावर आता स्वतः दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा कोणाशीही काही संपर्क नाही. हे गद्दार लोक अस्वस्थ आहेत. ते देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या संपर्कात असतात, मात्र आपण कोणताही दावा करणार नाही, असं दानवेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, शिरसाट यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.