¡Sorpréndeme!

Amritpal Singh: “…मग तेव्हा अटक का नाही केली?”, अमृतपाल सिंगच्या वडिलांचा पंजाब पोलिसांना सवाल

2023-03-19 1 Dailymotion

Amritpal Singh: “…मग तेव्हा अटक का नाही केली?”, अमृतपाल सिंगच्या वडिलांचा पंजाब पोलिसांना सवाल

खालिस्तानी समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंग याच्याविरोधात पोलिसांनी मोठी आघाडी उघडली आहे. अमृतपाल सिंगला फरार घोषित करण्यात आलं आहे. दुसरीकडे पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग यांनी भाष्य केलं आहे. तरसेम सिंग म्हणाले, “अमृतपाल सिंग फरार आहे, त्याला अटक केलीय याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी आमच्या घरी येत ३ ते ४ तास झाडाझडती घेतली. तेव्हा पोलिसांनी बेकायदेशीर असं काहीच सापडलं नाही. पण, अमृतपालबाबत पोलिसांनी आम्हाला माहिती द्यावी,” अशी मागणी तरसेम सिंग यांनी केली