¡Sorpréndeme!

Ashwini Jagtap: अश्विनी जगतापांनी दिली जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट; अधिकाऱ्याला धरलं धारेवर

2023-03-06 203 Dailymotion

भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. जगताप यांनी हॉस्पिटलची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांना आमदार अश्विनी जगताप यांनी तंबी देत धारेवर धरले. आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या नुकत्याच झालेल्या चिंचवड पोटनिवडणूकीत विजयी झाल्या आहेत.