¡Sorpréndeme!

'खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार..'; आयोगाच्या निर्णयावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

2023-02-17 110 Dailymotion

'खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार..'; आयोगाच्या निर्णयावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंडळींचं अभिनंदन करत होतो. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो की शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. कुणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकत नाही. बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे तीच खरी शिवसेना असं आम्ही सांगत होतोच. निवडणूक आयोगाने यावरच शिक्कामोर्तब केलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.