¡Sorpréndeme!

3 वर्ष कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात, मग आताच भाजपला का नकोसे? | Governor Bhagat Singh Koshyari | BJP

2023-02-13 658 Dailymotion

आपल्या वक्तव्यांनी नेहमी वादात अडकणारे भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आलाय. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत. खरंतर भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला राज्यपाल पदावरून मुक्त करावे अशी पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त केली होती. मी राजीनामा देण्यासाठी इच्छुक आहे, असं कोश्यारी म्हणाले होते. ण प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना कोश्यारींना विरोध होणं ठीक आहे, पण आता तर शिंदे-फडणवीस यांचंच सरकार आहे, मग कोश्यारींची उचलबांगडी कशी झाली? आधी इतका विरोध झाला पण आताच भाजपला कोश्यारी का नकोसे झाले? यामागे काय कारण आहे जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून.

#Governor #BhagatSinghKoshyari #BJP #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #HWNews #Resignation #PMModi