Turkey Earthquake:भूकंपाच्या काळात टर्कीच्या मदतीला भारत!; 'ऑपरेशन दोस्त' चालवून मित्रराष्ट्राची मदत
तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे विध्वंस झाला असून भारताने पहिल्या दिवसापासून मदतीचा हात पुढे केला आहे. भारत 'ऑपरेशन दोस्त' चालवत असून तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत डॉ. वीरेंद्र कौल हे या ऑपरेशनचे काम पाहत आहेत. डॉ. कौल यांच्याशी संवाद साधल्यावर ते म्हणाले की, 'या संकटाच्या काळात भारत तुर्कस्तानला सर्वतोपरी मदत करत आहे. भारतीय संघांकडून येथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे'#türkye #earthquake #india